आंध्रप्रदेश येथे अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणार्‍या पाद्य्राला अटक !

  • पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ 

  • राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या हस्तक्षेपानंतर कारवाई

  • हिंदु संतांवरील कथित आरोपांच्या संदर्भात सातत्याने गरळओक करणारे काँग्रेसी, निधर्मीवादी, प्रसारमाध्यमे आदी अशा पांद्य्रांविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणार्‍या पोलिसांवरही गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक
पाद्री उप्पलपती रवींद्र प्रसन्ना कुमार

कुरनूल (आंध्रप्रदेश) – चर्चमध्ये दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी येथील चट्टीवेदू गावातील पाद्री उप्पलपती रवींद्र प्रसन्ना कुमार याला अटक करण्यात आली. आरंभी पोलीस गुन्हा नोंदवण्यास नकार देत होते आणि तडजोड करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत होते. तथापि ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’च्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून सदर पाद्य्राला अटक केली. पाद्री उप्पलपती रवींद्र प्रसन्ना कुमार हा आंध्रप्रदेशमधील ‘राष्ट्रीय ख्रिस्ती बोर्डा’चा पदाधिकारीही आहे.