विहिंप आणि बजरंग दल यांची पोलीस आणि प्रशासन यांना निवेदनाद्वारे मागणी
नांदेड – नांदेड शहरात बंदच्या नावाखाली काही समाजविघातक प्रवृत्तींनी शहरातील व्यापारी, पोलीस आणि नागरिक यांच्यावर आक्रमण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ‘नांदेड बंद’च्या नावाखाली हिंदु व्यापारी आणि नागरिक यांच्यावर आक्रमण करणार्या समाजकंटकांवर कारवाई करा, या मागणीचे निवेदन विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे आणि निवासी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना १३ नोव्हेंबर या दिवशी देण्यात आले.
धर्मांधांनी केलेल्या आक्रमणाचा निषेध म्हणून १६ नोव्हेंबर या दिवशी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने ‘नांदेड बंद’चे आवाहन करण्यात आले आहे.