पुणे शहरातील गोवंशियांना पळवणार्‍या सक्रीय टोळीविरोधात कठोर कारवाई करावी !

अखिल भारत कृषी गोसेवा संघ, तसेच बजरंग दल गोरक्षा यांची पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

गोरक्षकांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? – संपादक

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना निवेदन देतांना १. श्री. मिलिंद एकबोटे, २. अभिजीत चव्हाण, तसेच अन्य

पुणे – गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी-चिंचवड, भोसरी, पिंपळे निलख येथे मध्यरात्री रस्त्यावर मोकाट फिरणार्‍या गायी, वासरे, गुरे यांना इंजेक्शन देऊन त्यांची चोरी करून त्यांना पशूवधगृहात अन् गावाबाहेरील मोकळ्या जागेत नेऊन त्यांची हत्या करण्यात येत आहे. या संदर्भात ‘अखिल भारत कृषी गोसेवा संघा’चे पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि बजरंग दल गोरक्षा प्रमुख अभिजीत चव्हाण यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. ‘पोलीस प्रशासनाने शहरातील जनावरे पळवणार्‍या सक्रीय टोळीविरोधात कठोर कारवाई करावी. गुन्हेगारांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी’, अशी मागणी या वेळी करण्यात आली. वसुबारसेच्या दिवशी पिंपळे निलख येथे मोकळ्या जागेत ५ गायी चोरून त्यांची अत्यंत निर्दयपणे हत्या करण्यात आली होती.