आसामच्या लोकसंख्येची धर्मनिहाय रचना पालटून वर्ष २०५० पर्यंत सत्ता मिळवण्याचा धर्मांधांचा प्रयत्न ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

  • असे करणार्‍या प्रत्येकावर कारवाई केली पाहिजे आणि त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी देशाला दिली पाहिजे ! – संपादक
  • राज्यात भाजपचे सरकार असतांना धर्मांधांकडून असा प्रयत्न होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गोहत्ती (आसाम) – आसाम राज्याच्या लोकसंख्येची धर्मनिहाय स्थिती पालटून वर्ष २०५० पर्यंत राज्यात सत्ता मिळवण्याचा प्रयत्न धर्मांधांकडून करण्यात येत आहे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केले. काही दिवसांपूर्वी दरांग जिल्ह्यातील सिपाझार येथे धर्मांधांनी पोलीस आणि अतिक्रमणविरोधी पथक यांच्यावर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, आक्रमण करणार्‍यांपैकी बहुतेक जण राज्याबाहेरून आले होते. त्यांचे हळूहळू भूमीवर अतिक्रमण करण्याचे षड्यंत्र होते. आता होजाई जिल्ह्यातील लुमडिंग आणि सोनितपूर येथील भूमींवर अतिक्रमण करणे, हे त्यांचे लक्ष्य आहे. त्यांनी नागावच्या बतदरोबा येथे आधीच नियंत्रण मिळवले आहे. अशा प्रकारचे ते लोकसंख्येची स्थिती पालटण्याचा प्रयत्न करत आहेत.