…श्रीकृष्णाची कृपा होण्याची हीच संधी असे।

गुरु नानकापूर्वी कुणीही शीख नव्हता, तरीही खलिस्तानवाद का ?
प्रेषित महंमद यांच्या आधी एकही मुसलमान नव्हता, तरीही जिहाद का ?
कार्ल मार्क्सच्या आधी कुणी साम्यवादी नव्हते, तरीही साम्यवाद का ?।। १।।

पू. शिवाजी वटकर

कृष्णापूर्वी राम, रामापूर्वी ऋषिमुनी अन् आरंभी सनातन वैदिक अनुयायी होते।
सनातन धर्म अनादी असतांना हिंदूंची सध्याची स्थिती दयनीय का ?
जागृत अन् संघटित होण्याचा विचार हिंदूंनी करण्याची वेळ आली आहे।। २।।

विचार करूनी शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक बळ वाढवण्याची हीच वेळ असे।
धर्माचरण, धर्माभिमान आणि साधना करून श्रीकृष्णाची कृपा होण्याची हीच संधी असे।
लक्षात असू द्यावे सुक्यासह ओलेही जळून जाण्याची वेळ जवळ आली असे।। ३।।

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.९.२०२४)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक