वर्ष २०२४ मध्ये सप्टेंबर मासात पितृपक्षाला आरंभ झाल्यापासून मला तीव्र स्वरूपाचा आध्यात्मिक त्रास होऊ लागला. सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी त्या त्रासाने टोक गाठले. नवरात्रीला आरंभ होताच पुढील काही दिवसांत मला काही कविता सुचल्या. त्या श्री मां जगदंबा आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करतो.
गुरुकृपा
अंतःकरणी ठसली तव मूर्ती ।
करावीस कृपा हे करुणामूर्ती ।। १ ।।
कृपासिंधु तू वात्सल्यमूर्ती ।
आस मम मनी पहावी चिद्घनमूर्ती ।। २ ।।
भाव न ठसला कधी मम हृदयी ।
परि तळमळे चित्त पहाण्या कृपामयी ।। ३ ।।
तळमळे धडपडे मम मन ।
परि न होई कधी स्मरण ।। ४ ।।
साद ऐकीली त्वा लेकराची ।
स्मरण होताच लाभे शांती चित्तासी ।। ५ ।।
ऐसे करुणाकर जगदंबा नि गुरुदेव ।
घेती उचलूनी मज कडेवर सदैव ।। ६ ।।
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१०.२०२४)
|