सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करतांना कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या नागरिकांना आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीची आवश्यकता नाही; मात्र ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या नाहीत, त्यांनी जिल्ह्यात प्रवेश करतांना ७२ घंटे आधीचा ते आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीत कोरोनाबाधित न आढळल्याचा अहवाल समवेत बाळगावा. १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण होत नसल्याने त्यांच्या प्रवेशास आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी अहवाल आवश्यक असणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
२ मात्रा घेतलेल्या नागरिकांनी शासनाच्या https://epassmsdma.mahait.org/LoginHandler.htm या संकेतस्थळावर प्राप्त होणारा ‘पास’ उपलब्ध करून घ्यावा. यामुळे प्रवासाच्या काळात तपासणीकरिता लागणारा वेळ वाचेल. गणेशोत्सवासाठी राज्यशासनाच्या गृहविभागाने परिपत्रकाद्वारे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.