सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ५४ नवीन रुग्ण आढळले, तर ५ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र ३२५ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० सहस्र ३९५ झाली आहे. २२ ऑगस्ट या दिवशी ११ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ४७ सहस्र ३८४ झाली आहे. सद्य:स्थितीत १ सहस्र ६८४ रुग्णांवर उपचार चालू आहेत.