अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर व्यवस्थापक नेमण्यात यावा !

राष्ट्रीय वारकरी परिषदेची प्रसिद्धीपत्रकाद्वारे मागणी

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २१ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदु धर्म, संत, देवता हे खोटे आहेत, असा दावा करणारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आता भ्रष्ट कारभाराने त्रस्त झाल्याचे दिसत आहे. हिंदु जनजागृती समिती, हिंदु विधीज्ञ परिषद, राष्ट्रीय वारकरी सेना यांनी धर्मादाय आयुक्त सातारा येथे तक्रार केल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या अहवालातून अंनिसचा खोटारडेपणा सिद्ध झाला आहे. अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि दाभोलकर परिवार यांच्यात गटबाजी चालू झालेली दिसते. त्यामुळे सध्याच्या शिवसेना आघाडी सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर प्रशासक नेमावा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, अंनिस हिंदु धर्म, ग्रंथ, सण, व्रते, देवता, साधू, संत, भविष्य इत्यादींविषयी गैरसमज पसरवत असते. हिंदु धर्माविरुद्ध वक्तव्य करून पैसा आणि प्रसिद्धी मिळवणार्‍या अंनिसचे भविष्य अंधारात आहे. पुणे येथे झालेल्या आंदोलनात दाभोलकर परिवाराला तोंड काळे करावे लागले, याचा अर्थच मुळी अंनिसचे भविष्य अंधारात चालल्याची चाहूल आहे. राष्ट्रीय वारकरी परिषदेने ‘अंनिसच्या कारभारावर प्रशासक नेमावा’, अशी मागणी मागील भाजप आणि त्यापूर्वीच्या काँग्रेसच्या सरकारकडेही केली होती.