कोची (केरळ) – येथील थिरूवनंतपुरम् जिल्ह्यातील युवा साधक कु. देवनारायणन् शर्मा याला बारावीच्या सी.बी.एस्.सी.च्या (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या) परीक्षेत ९७.६० टक्के गुण मिळाले आहेत. तो केरळ येथे पूर्णवेळ सेवा करणार्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. रश्मी परमेश्वरन् यांचा भाचा आहे. कु. देवनारायणन्ची आई सौ. रजनी विनोद आणि आजी श्रीमती सावित्री परमेश्वरन् या दोघी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत.