पाकमधील ८ वर्षांच्या हिंदु मुलावरील ईशनिंदेच्या आरोपाविरोधात भारतातील धर्मप्रेमींकडून #SaveHinduBoyInPak ट्रेंड !

राष्ट्रीय ट्रेंडमध्ये तिसर्‍या क्रमांकावर !

मुंबई – पाकमध्ये ८ वर्षांच्या हिंदु मुलावर ईशनिंदेचा गुन्हा नोंदवून त्याच्यावर खटला चालवण्यात येत आहे. त्याला या प्रकरणात फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे. त्याच्या कुटुंबियांनी म्हटले आहे, ‘या मुलाला ईशनिंदा म्हणजे काय, हेही ठाऊक नसतांना त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.’ सध्या हा मुलगा पोलिसांच्या कह्यात आहे. या प्रकरणी ११ ऑगस्ट या दिवशी भारतातील धर्मप्रेमींनी ट्विटरवर  #SaveHinduBoyInPak या नावाने ‘हॅशटॅग’ ‘ट्रेंड’ करून ‘या मुलाला भारत शासन आणि मानवाधिकार संघटना यांनी साहाय्य करावे’, अशी मागणी केली. हा ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर तिसर्‍या क्रमाकांवर होता. १० सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींनी ट्वीट्स करून कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचे सांगितले. पाकमधील हिंदूंच्या रक्षणासाठी हा कायदा तेथील सरकारने रहित करावा, अशी मागणीही या वेळी केली.