चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानकडून साहाय्य !

पुरग्रस्तांसाठी चादरींची मदत धर्मादाय कार्यालयाकडे सुपुर्द करतांना अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज संस्थानचे पदाधिकारी

अक्कलकोट – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना १०० चादरी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे यांनी सोलापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सुपुर्द केल्या, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली.

या वेळी अध्यक्ष महेश इंगळे म्हणाले, ‘‘श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती ही सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या वतीने वर्षभरात विविध धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. दळणवळण बंदीच्या काळात देवस्थानच्या वतीने शहरातील गरजूंना भोजन, कोरोना रुग्णांवर देवस्थानच्या रुग्णालयात उपचार आणि भक्त निवासमध्ये निवासव्यवस्था अखंडपणे केली आहे. गतकाळात कोल्हापूर आणि सांगली परिसरातील पूरग्रस्त नागरिकांसाठी मंदिर समितीच्या वतीने स्वामी प्रसाद म्हणून आर्थिक साहाय्यही देण्यात आले होते.’’