गुरुदेव, एकच मागणे आपल्या चरणी ।

आषाढ कृष्ण पक्ष पंचमी (२८.७.२०२१) या दिवशी सांगली येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांचा ७७ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांनी गुरुचरणी अर्पण केलेले काव्यरूपी कृतज्ञतापुष्प पुढे दिले आहे.

‘माझ्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त गुरुमाऊली परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी आर्त प्रार्थना !

श्री. दत्तात्रेय कुलकर्णी

श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांना ७७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !

गुरुदेव, आयुष्याच्या या कातरवेळी ।
एकच मागणे आपल्या चरणी ।। १ ।।

आपल्या कोमल चरणी, सदा ठेवा जवळी ।
बाकी काही नाही मागणे तुम्हा जवळी ।। २ ।।

जे जे मनी आणिले, ते ते तुम्ही मला दिले ।
इच्छा न उरली काही मागण्याची ।। ३ ।।

मी काही न देता आपणांसी ।
या पामरास जवळी केले ।। ४ ।।

माझे अपराध पोटात घालूनी ।
मला आधार देणारी पत्नी दिली ।। ५ ।।

माझी सदोदित काळजी घेणार्‍या ।
गुणसंपन्न कन्या आणि जामात (टीप १) दिले ।। ६ ।।

वेळोवेळी साहाय्य आणि प्रेम करणारे साधक दिले ।
मला सनातन संस्थेची ओळख दिलीत ।। ७ ।।

अनेक विकल्प आणि अडचणींतून साधनेत टिकवून ठेवले ।
माझे अपराध पोटात घालून
जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त केले ।। ८ ।।

आता एकच मागणे ।
या वाल्याला वाल्मीकिऋषींच्या मांदियाळीपर्यंत (टीप २) जाण्यासाठी ।
तुम्ही मला बळ, शक्ती आणि बुद्धी द्या ।। ९ ।।

टीप १ – जावई

टीप २ – संतपदापर्यंत

कृतज्ञतापूर्वक,

– श्री. दत्तात्रय कुलकर्णी, गावभाग, सांगली. (१९.५.२०२१)