सोलापूर – येथील सदर बझार पोलीस ठाणे येथे एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून ओवेज पठाण या संशयित तरुणाच्या विरोधात मुलीच्या वडिलांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. मागील १० दिवसांमध्ये शहरात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची ही दुसरी घटना आहे. (पोलिसांनी संबंधित घटनेतील आरोपीचा शोध घेऊन त्वरित कार्यवाही करावी, तसेच अशा घटना रोखण्यासाठी विविध उपाययोजना काढून अल्पवयीन मुलींचे रक्षण करावे, हीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे. – संपादक)
तक्रारदारांची मुलगी इयत्ता १० वी मध्ये शिकत होती. २२ जुलै या दिवशी मुलगी शाळेमध्ये वही तपासण्याच्या निमित्ताने गेली होती. पुष्कळ वेळ लोटूनही मुलगी आली नाही हे पाहून वडील शाळेत चौकशी करण्यास गेले असता ती न सांगता निघून गेल्याचे समजले. मुलीच्या मैत्रिणींकडे चौकशी केल्यानंतर शाळेतील एका मुलासमवेत ती निघून गेल्याची माहिती मिळाली. संबंधित मुलाच्या घरी चौकशी केली असता मुलगा घरी नव्हता. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी सदर बझार पोलीस ठाणे येथे त्या संशयित मुलाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली.