५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. सान्वी रोहन बडगुजर (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. सान्वी रोहन बडगुजर एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आषाढ शुक्ल पक्ष तृतीया (१३.७.२०२१) या दिवशी पुणे येथील चि. सान्वी रोहन बडगुजर हिचा दुसरा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आणि आई-वडिलांना तिच्या जन्मानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

चि. सान्वी बडगुजर

चि. सान्वी बडगुजर हिला दुसर्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. जन्मापूर्वी

१ अ. गर्भावर संस्कार होण्याच्या दृष्टीने विविध प्रयत्न करणे : ‘गर्भधारणा झाल्यानंतर मी नऊ मास गर्भावर संस्कार होण्याच्या दृष्टीने ‘नामजपादी उपाय करणे, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करणे, प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकणे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चलत्चित्र बघणे, गर्भसंस्कारासाठीचे श्लोक म्हणणे आणि सत्संग ऐकणे’ इत्यादी कृती करत असे.

१ आ. मला संपूर्ण गर्भारपणात मळमळत होते. त्या वेळी पोटावर दैनिक ‘सनातन प्रभात’ ठेवल्यावर मला बरे वाटत असे.

१ इ. सत्संग ऐकतांना आणि नामजप करतांना पोटातील बाळाने हालचाल करून प्रतिसाद देणे : नवव्या मासात एकदा एक सत्संग ऐकतांना मी पोटावर हात ठेवून बाळाला विचारले, ‘बाळा, सत्संग ऐकत आहेस ना !’ तेव्हा बाळाने हालचाल करून प्रतिसाद दिला. मी श्रीरामाचा नामजप केल्यावर पोटातील बाळाची हालचाल वाढत असल्याचे माझ्या लक्षात आले.

२. जन्मानंतर

सौ. शर्वरी बडगुजर

बाळाचे छायाचित्र सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांना दाखवल्यावर त्यांनी ‘दुर्गा आणि लक्ष्मी जन्माला आली आहे’, असे सांगितले.’ – सौ. शर्वरी बडगुजर (आई)

३. जन्म ते ६ मास

३ अ. सान्वीच्या टाळूवर हात ठेवून नामजप केल्यावर तिचे शरीर थरथरणे आणि ‘त्या प्रतिसादातून तिला शक्ती मिळाली’, असे जाणवणे : ‘मी आठव्या दिवशी सान्वीला भेटायला गेल्यावर तिच्या टाळूवर हात ठेवून ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप केला. त्या वेळी तिचे शरीर थरथरले. तेव्हा ‘तिने दिलेल्या प्रतिसादातून तिला शक्ती मिळाली’, असे मला जाणवले.’ – श्री. रोहन बडगुजर (वडील)

३ आ. ‘सान्वी अनेकदा ‘तर्जनी अंगठ्याच्या टोकाला लावणे (ज्ञानमुद्रा) आणि मधले बोट अंगठ्याच्या टोकाला लावणे’ या मुद्रा सहज करत असे.

४. वय ७ मास ते १ वर्ष

अ. १३.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘ऑनलाईन’ जन्मोत्सव सोहळा तिने आनंदाने पाहिला. त्यातील ‘धन्य धन्य हम हो गये गुरुदेव ।’ हे कृतज्ञतागीत तिला विशेष आवडले. त्यानंतर मी हे गीत गुणगुणले, तरी तिला आनंद होत असे.

५. वय १ ते दीड वर्ष

श्री. रोहन बडगुजर

५ अ. परात्पर गुरुदेवांप्रतीची ओढ

१. एकदा ती जेवत नव्हती. तेव्हा मी तिला भ्रमणभाषवर बालगीत लावून दिले; परंतु तिने ते बंद केले. त्यानंतर तिने ‘सनातन प्रभात ॲप’ उघडून त्यातील परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राला घास भरवण्याची कृती केली आणि छायाचित्रातील परात्पर गुरुदेवांना ‘खा’, असे म्हणून ती स्वतः खाऊ लागली. प्रत्यक्षात मी तिला असे काहीच शिकवले नव्हते.

२. एकदा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ उघडण्यापूर्वी तिने स्वतःहून हात जोडले आणि पहिल्यांदाच ‘हे गुरुदेवा’, असे शब्द उच्चारले.

६. वय दीड ते २ वर्षे

६ अ. सद्गुरूंच्या सत्संगात रहाण्यास आवडणे : फेब्रुवारी २०२१ मध्ये जळगाव येथे माझ्या सासरी गेल्यानंतर मला घरी सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्या समवेत रहाण्याची संधी मिळाली. तेथे सान्वी सद्गुरु काकांच्या समवेत असायची. ती त्यांना ‘आबा’ म्हणत असे. तिला त्यांच्याशी खेळायला आवडायचे.

६ आ. देवाची आवड

१. सान्वी संध्याकाळी ‘ज्योत से ज्योत जगाओ…’, ही आरती करण्याची आठवण करून देते.

२. ती ‘दुर्गादेवी, गणपति, दत्त, शिव आणि श्रीकृष्ण’ या देवतांचे नामजप करते.’ – सौ. शर्वरी बडगुजर

६ इ. ‘ती आठवड्यातून १ – २ वेळा रात्री किंवा पहाटे झोपेतून मधेच उठते. तेव्हा सान्वी रडल्यानंतर आम्ही ‘प.पू. डॉक्टर’, असा नामजप केल्यावर ती क्षणात शांत होते.’ – श्री. रोहन बडगुजर

७. चि. सान्वीचा स्वभावदोष

‘हट्टीपणा’

‘परात्पर गुरुदेव, ‘आपणच सान्वीविषयीची सूत्रे आमच्याकडून लिहून घेतलीत’, यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. रोहन बडगुजर आणि सौ. शर्वरी बडगुजर, पुणे (२.७.२०२१)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.