परात्पर गुरूंचे चरण पहाता ।
काशी विश्वेश्वर दिसतो ।
तीर्थक्षेत्राचा आनंद मिळतो ।
धन्य ती गोमंतक नगरी ।
कशाला जाऊ तीर्थक्षेत्री ।। १ ।।
परम भाग्य माझे,
झालो मी आश्रमवासी ।
आश्रमामध्ये सेवा घडावी,
ही आशा असे उरी ।। २ ।।
मी अपंग झालो, हे चांगलेच जाहले ।
एका ऋषितुल्य महात्म्याचे ।
कवित्व करण्याचे भाग्य मला लाभले ।। ३ ।।
देवा, माझे उरलेले आयुष्य ।
सेवा करण्यात जाऊ दे ।
कशातही नाही राहिली इच्छा ।
तुझ्याच द्वारी मुक्ती मिळावी ।
हीच सुधाची स्वेच्छा ।। ४ ।।
– श्री. सुधाकर जोशी (वय ९२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.६.२०२०)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |