अण्वस्त्रे ठेवण्यासाठी चीनकडून खोदले जात आहेत १०० हून अधिक खड्डे !

युद्धखोर चीनला धडा शिकवण्यासाठी भारतानेही सर्वतोपरी सिद्धता करणे किती आवश्यक आहे, हे यातून स्पष्ट होते !

चीनच्या उत्तर-पश्‍चिम भागातील यूमेन शहर

बीजिंग – चीनच्या उत्तर-पश्‍चिम भागातील यूमेन शहराजवळच्या वाळवंटात १०० हून अधिक परमाणू अण्वस्त्रे ठेवण्यासाठीचे ‘साइलो’ (अणवस्त्रे ठेवण्यासाठीचा खड्डा) सिद्ध केले जात आहेत. उपग्रहाद्वारे काढलेल्या छायाचित्रांतून चीनचे हे गुपित उघड झाले. ‘साइलो’ हा एक लांब आणि खोल खड्डा असतो, ज्याच्या आतमध्ये अंतरमहाद्वीपीय परमाणू बॅलिस्टिक अणवस्त्रे ठेवली जातात. आवश्यकता पडल्यास या साइलोचे झाकण उघडून ही अण्वस्त्रे थेट शत्रूवर डागली जाऊ शकतात. विशेष म्हणजे ही अण्वस्त्रे थेट अमेरिकेपर्यंत मारा करण्याच्या क्षमतेची आहेत. कॅलिफॉर्नियातील मॉन्टेरीस्थित ‘जेम्स मार्टिन सेंटर फॉर नॉनप्रोलिफिरेशन स्टडीज्’ या संस्थेतील संशोधनकर्त्यांनी या छायाचित्रांचा अभ्यास केला. परमाणू अणवस्त्रांच्या संदर्भात चीन हा जगातील ५ वा सर्वांत शक्तीशाली देश आहे.