नशिबाचा फेरा कोण जाणतो ।

श्री. सुधाकर जोशी

मानवा, सूर्य उगवतो
अन् मावळतो ।
हे तू नित्य पहातो ।
नशिबाचे वारे उलटे फिरता,
तू हे कधी पहातो ।। १ ।।

एक राजा डोेंबाघरी
पाणी भरतो ।
एक राजपुत्र चौदा वर्षे
वनवास भोगतो ।
नशिबाचा फेरा कोण जाणतो ।। २ ।।

पाच पांडव राजपुत्र ।
नशिबाचे वारे फिरता, झाले ते भूमीपुत्र ।
असा खेळ कोण जाणतो ।। ३ ।।

ऊन-पावसाचा खेळ निराळा ।
कधी उन्हाळा, कधी पावसाळा ।
सर्व संकटांमध्ये मात्र तरून जातो ।
असा हा खेळ कोण करतो ।। ४ ।।

संसारामध्ये चढ-उतार येतच असतात ।
ईश्वराचे नाम घेत, जो मार्ग काढतो ।
तो ईश्वरभक्त होतो, हे तू कधी जाणतो ।। ५ ।।

– श्री. सुधाकर के. जोशी (वय ९२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.(५.५.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक