‘गुरुपौर्णिमेच्या (१६.७.२०१९ या) दिवशी सकाळी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेनुसार सनातनची गुरुपरंपरा (श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद महाराज, श्री अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे गुरुबंधू प.पू. रामानंद महाराज, प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य डॉ. जयंत बाळाजी आठवले, ही सनातनची गुरुपरंपरा आहे.) आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुका यांचे पूजन करण्यात आले. त्यामुळे मला ही गुरुपौर्णिमा आजपर्यंतच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमांपेक्षा वेगळीच वाटत होती. त्या प्रसंगी मला आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. गुरुपादुकांचे पूजन करणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना बघून माझी भावजागृती होत होती अन् आनंद जाणवत होता.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ गुरुपादुकांचे पूजन करतांना त्यांवर मला प.पू. भक्तराज महाराज यांचे चरण दिसले. तेव्हा ‘देवाने मला चरणांचे दर्शन देऊन माझ्यावर कृपा केली आहे. ‘गुरुपादुकांमधून पांढराशुभ्र प्रकाश सर्वत्र पसरत आहे आणि तेथील वातावरणात पुष्कळ गारवा आहे’, असे मला जाणवले.
३. गुरुपादुकांच्या उजव्या बाजूला वाहिलेल्या गुलाबाच्या एका फुलावर मला ‘ॐ’ चा आकार दिसला. पादुकांभोवतीच्या पिवळ्या आणि पांढर्या फुलांचा आकार ‘पुष्कळ मोठा मोठा होत आहे’, असे मला दिसले. पिवळ्या चाफ्याच्या कळ्या हळूहळू उमलत होत्या. आज गुरुचरणी आल्यामुळे ती फुले कृतज्ञता व्यक्त करत असल्याचे मला जाणवले.
४. गुरुपादुकांवर वाहिलेल्या निळ्या रंगाच्या कमळामध्ये मला श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले.’
– सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.७.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |