पुरो(अधो)गाम्यांना ‘मॉब लिंचिंग’च्या (जमावाने केलेल्या हत्येच्या) अशा घटना कशा दिसत नाहीत ? अशा वेळी त्यांची बोबडी वळते का ?
भिवंडी – येथे विजेची देयके जमा न केल्यामुळे वीज आस्थापनाने वीजतोडणीची मोहीम चालवली होती. वीज तोडण्यास गेलेल्या तुकाराम पवार या सुरक्षा कर्मचार्याला येथील जमावाने मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या भागातील बर्याच लोकांनी अनेक मासांपासून विजेचे देयक भरले नव्हते. त्यामुळे तुकाराम पवार येथील कापड गिरण्या असलेल्या भागात वीज तोडण्यास गेले असता १२ ते १५ जणांच्या गटाने पवार यांच्याशी वादावादी करण्यास आरंभ केला. त्यांना पुष्कळ मारहाणही केली. घायाळ झालेल्या पवार यांना रुग्णालयात भरती करण्यासाठी नेले जात असतांनाच त्यांचा मृत्यू झाला.
निजामपुरा पोलिसांनी पवार यांचा अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर यावर कारवाई करू, असे पोलिसांनी सांगितले.
पवार यांच्या मुलाने सांगितले की, वीज आस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे, तर वीज आस्थापनाच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे की, वीज तोडण्याची ही नेहमीची मोहीम असल्याने पोलीस संरक्षण मागण्यात आले नव्हते. विशेष अभियान असल्यासच संरक्षण मागितले जाते. (संवेदनाहीन आणि हास्यास्पद स्पष्टीकरण देणारे वीज आस्थापन ! – संपादक)