मेरठ (उत्तरप्रदेश) येथे एका साधूची दगडांनी ठेचून हत्या

उत्तरप्रदेशात सातत्याने साधू, महंत आदींच्या हत्या होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्या थांबवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

 

प्रतिकात्मक छायाचित्र

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील बढला गावामध्ये साधू चंद्रपाल यांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ते येथील एका मंदिरात रहात होते. येथेच त्यांची दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली आहे. ते गेल्या १० – १२ वर्षांपासून गावात रहात होते.