पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांकडून माजी पोलीस अधिकार्‍यासह त्यांची पत्नी आणि मुलगी यांची हत्या

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही, हेच आतंकवादी भारताला दाखवून देत आहेत. तो नष्ट करण्यासाठी त्यांचा पोशिंदा पाकला नष्ट करा !

घटनास्थळी सुरक्षादलाचा घेराव

पुलवामा (जम्मू-काश्मीर) – जम्मूमधील भारतीय वायूदलाच्या तळावर ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणानंतर २४ घंट्यांतच जिहादी आतंकवाद्यांनी येथील अवंतीपोरा भागात विशेष माजी पोलीस अधिकारी फय्याज अहमद यांची हत्या केली. आतंकवाद्यांनी अहमद यांच्या घरात घुसून त्यांची आणि त्यांची पत्नी अन् अल्पवयीन मुलगी यांची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेनंतर सुरक्षादलाने संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे, तसेच आतंकवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम चालू केली आहे. फय्याज अहमद यांचा मुलगा सैन्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.