गरजू विद्यार्थी अध्यात्मप्रसारकांना सायकल वितरण करण्याचे ध्येय
धर्मनिष्ठ दानशूरांना नमस्कार !
आपणा सर्वांना कळवण्यात आम्हाला आनंद होत आहे की, सनातन संस्था भारतातील १७ राज्यांमध्ये कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने अनेक साधकांना विविध प्रशिक्षण शिबिरे आणि अध्यात्म-अभ्यास वर्ग यांद्वारे ‘अध्यात्मप्रसारक’ म्हणून घडवण्यात येत आहे. या प्रशिक्षणातून घडलेले बहुतांश अध्यात्मप्रसारक साधक हे विद्यार्थीदशेतील म्हणजे महाविद्यालयीन अथवा पदवी शिक्षण घेत असलेले आहेत. यांपैकी ग्रामीण क्षेत्रात कार्य करणार्या आणि गरजवंत विद्यार्थ्यांना शिक्षण आणि अध्यात्मप्रसार या गोष्टी करणे सुलभ व्हावे, या हेतूने सुविधा शंकर गोखले ‘अध्यात्मप्रसारक सेवा योजने’चा शुभारंभ करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंतर्गत गरजू विद्यार्थी अध्यात्मप्रसारकांना सायकल वितरण करण्याचे ध्येय आहे.
जुन्या काळापासून प्रसिद्ध असलेली काळ्या रंगाची ‘क्लासिक’ सायकल जड वस्तू घेऊन जाणे, तसेच मजबुतीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतात. यासाठी फॅन्सी स्वरूपाच्या सायकली न घेता ‘क्लासिक’ सायकली या योजनेखाली घेण्यात येणार आहेत. सामान्यत: एका सायकलीचे मूल्य ५०००/- रुपये एवढे आहे. यानुसार या योजनेच्या प्रारंभिक टप्प्याचा व्यय १५ लाख रुपये एवढा आहे. विद्यार्थीदशेतील अध्यात्मप्रसारकांच्या कार्याला गती देण्यासाठी ही योजना भविष्यात सतत चालू रहाणार असून याद्वारे अर्पणदात्यांनाही अध्यात्मप्रसाराच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होता येणार आहे.
अध्यात्मप्रसाराच्या कार्यासाठी दान करणे, हे धर्मशास्त्रानुसार सत्पात्रे दान आहे. यासाठी आम्ही आवाहन करत आहोत की, या योजनेसाठी आपण स्वक्षमतेनुसार धर्मदान करून अध्यात्मप्रसाराच्या कार्यात आपला सहभाग नोंदवू शकता !
आपल्याला या योजनेसाठी धर्मदान करायचे असल्यास सौ. भाग्यश्री सावंत यांना ७०५८८८५६१० या क्रमांकावर अथवा [email protected] या ई-मेल पत्त्यावर कळवावे, ही नम्र विनंती !
– श्री. वीरेंद्र पांडुरंग मराठे, कार्यकारी विश्वस्त, सनातन संस्था आणि श्री. शंकर दत्तात्रेय गोखले, अध्यक्ष, सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई.