‘आयुर्वेद जगा !’ विशेषांकाच्या माध्यमातून पू. वैद्य विनय भावे यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

२७ जून २०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘मुंबई, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ’ या आवृत्तीच्या गुरुपौर्णिमा विशेषांक मालिकेतील ‘आयुर्वेद जगा !’ हा विशेषांक प्रसिद्ध करण्याचे नियोजन ४ मासांपूर्वीच झाले होते.

२५ जून २०२१ च्या रात्री सनातनचे पू. वैद्य विनय भावे यांनी देहत्याग केला. पू. वैद्य विनय भावे यांचे सनातननिर्मित आयुर्वेदाची उत्पादने आणि आयुर्वेदाची औषधे बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. सनातनच्या ‘आयुर्वेद’ या विषयावरील ग्रंथमालिकांच्या लिखाणातही त्यांचा सहभाग होता. सनातननिर्मित आयुर्वेदाची उत्पादने आणि पू. भावेकाका यांचे आयुर्वेदाचे ज्ञान यांचा अनन्यसाधारण लाभ पुढील आपत्काळात, तसेच पुढील कित्येक वर्षे समाजाला होणार आहे.

आयुर्वेदाच्या प्रसाराच्या उद्देशाने काढलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘आयुर्वेद जगा !’ या विशेषांकाच्या माध्यमातून पू. वैद्य विनय भावे यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !