मडिकेरी (कर्नाटक) येथे फेसबूकवर युवतीच्या नावाने एका महिलेला अश्‍लील संदेश पाठवणार्‍या धर्मांधाला चोपले !

प्रतिकात्मक छायाचित्र

मडिकेरी (कर्नाटक) – युवतीच्या नावाने महिलेला अश्‍लील संदेश पाठवणार्‍या धर्मांध युवकाला युक्तीने बोलावून घेऊन त्याला बदडून पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याची घटना मडिकेरी येथे घडली आहे.

मडिकेरीसमीप असलेल्या हाकत्तूरू येथील अश्रफ नावाचा युवक गेल्या १५ दिवसांपासून युवतीच्या नावाने एका महिलेशी अश्‍लील संभाषण (चॅटींग) करत होता. स्वतःचे ‘अरुणा’ असे नाव सांगणार्‍या त्या धर्मांधाला युक्तीने मडिकेरीला बोलावण्यात आले. बस थांब्यावर सापडलेल्या त्या युवकाला चोपण्यात आले आणि नंतर पोलिसांकडे देण्यात आले. त्याच्या चौकशीत या कृत्यात त्याचे आणखी दोन सहकारी सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.