‘एके दिवशी मी ध्यानमंदिरात बसलो होतो. तेव्हा ‘तू ध्यानमंदिरात नामजपाला कधी येणार ?’, याची मी वाट पहात होतो’, असे श्री हनुमंताने (सूक्ष्मातून ध्यानमंदिरातील चित्रातून प्रकटलेल्या) मला विचारले. तेव्हा मी ‘का ?’, असे त्याला विचारले. त्यावर हनुमंत मला म्हणाला, ‘मला तुला काही सांगायचे आहे. मी त्रेतायुगात श्रीरामाच्या समवेत स्थुलातून होतो, द्वापरयुगात श्रीकृष्णाच्या समवेत होतो आणि आता कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत सूक्ष्मातून साहाय्यासाठी असणार आहे. या सूक्ष्मातील युद्धासाठी अन्यही देवता सिद्ध आहेत. लवकरच सूक्ष्मयुद्धाला आरंभ होणार आहे. या युद्धात सर्व साधकांच्या संरक्षणाचे दायित्व माझ्यावर आहे.’
हनुमंत पुढे म्हणाला, ‘त्रेतायुगात रामनाम घेणार्यांचे मी रक्षण केले, द्वापरयुगात श्रीकृष्णाचे नाम घेणार्यांचे रक्षण केले आणि आता कलियुगात परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेली साधना करणार्यांचे रक्षण मी करणार आहे.’
गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजनाच्या रथावर असल्याचे तू मला ओळखलेस; म्हणूनच मी हे सर्व तुला सांगितले. (‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीकृष्णाच्या रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्या चित्रातील श्रीकृष्णाच्या रथावर हनुमान आहे.’ – संकलक) हे सांगितल्यानंतर हनुमान अंतर्धान पावला. ही अनुभूती दिल्याविषयी मी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– श्री. नंदकिशोर दत्तात्रेय नारकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.७.२०२०)
|