सातारा, १८ जून (वार्ता.) – महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणार्या महाबळेश्वर येथील केळघर घाटात १९ जून या दिवशी पहाटे २ वाजता रस्त्यावर दरड कोसळली. महाबळेश्वर ते तापोळा या रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती, तसेच विद्युत् पुरवठाही खंडित झाला होता. सकाळी जेसीबीच्या साहाय्याने दरड हटवण्याचे चालू करण्यात आले. नंतर वाहतूक मंद गतीने चालू करण्यात आली.