पनवेल, रायगड येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. गणेश तांबे यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्या निमित्ताने साधिकेने कवितेच्या माध्यमातून दिलेल्या शुभेच्छा येथे दिल्या आहेत.
गुरुप्राप्तीची ज्यांना आहे आस ।
गुर्वाज्ञापालनाचा नेहमी धरती ध्यास ॥ १ ॥
गुरुसेवेत मग्न असती सदा ।
असे आम्हा सर्वांचे प्रिय गणेशदादा ॥ २ ॥
साधनेची नेहमी धरती कास ।
गुरुसेवेसाठी करती विविध प्रयास ॥ ३ ॥
गुरूंना कसे आठवावे ।
गुरूंना कसे आळवावे ।
गुरूंना कसे शरण जावे ॥ ४ ॥
याच विचारांत असती ते सदैव ।
असे हे कलियुगातील ‘एकलव्य’ ॥ ५ ॥
गुरुचरणांचा कसा असावा ध्यास ।
दादांच्या प्रयत्नांतून प्रचीती येते आम्हास ॥ ६ ॥
गुरुदेवांचे आहेत लाडके आमचे गणेशदादा ।
विविध संतांच्या माध्यमातून कौतुक करती सदा ॥ ७ ॥
गणेशदादांची होऊ दे विहंगम मार्गाने प्रगती ।
अशीच प्रार्थना आहे श्री गुरुचरणांवरी ॥ ८ ॥
– सौ. नेहाली शिंपी, ठाणे (१३.४.२०२१)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |