आध्यात्मिक मित्रांना घेतले परात्पर गुरु डॉक्टरांनी चरणांशी ।

प्रत्येक साधकावर कृपादृष्टी असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्री. तुकाराम लोंढे यांच्याशी माझी आध्यात्मिक मैत्री परात्पर गुरुदेवांनी लावून दिली. गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादामुळे मागील २५ वर्षे ती टिकून आहे. ती कशी आहे ?  याविषयी गुरुमाऊलीने स्फूर्ती देऊन, त्याविषयी काव्य सुचवून लिहून घेतले. ते त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले
(पू.) श्री. शिवाजी वटकर
श्री. तुकाराम लोंढे

तुकाराम मित्र माझे
गेले हो रामनाथी (टीप १)
परम पूज्य (टीप २)
त्यांची विचारपूस करती ।
ते स्वतःविषयी न सांगता
मित्राविषयी सांगती ।। १ ।।

परम पूज्य म्हणती त्यांची काळजी नको आता ।
तुमचे काय चालले आहे,
ते आधी सांगा ।
तुकाराम पुन्हा वटकरकाकांच्या प्रगतीविषयी विचारती ।। २ ।।

मित्राचा भाव पाहूनी, परम पूज्य जाती आनंदुनी ।
‘मित्र असावे ऐसे’ असे साधकांना सांगती ।
तेव्हा तुकाराम जाती भावावस्थेशी ।
दोन्ही मित्रांना घेतले परम पूज्यांनी चरणांशी ।। ३ ।।

दोघा मित्रांच्या अनंत अडचणी असूनी ।
गुरुकृपेने कठीण प्रारब्धावर मात करूनी ।
परम पूज्यांच्या चरणी सर्व भार टाकूनी ।
आनंदी रहाती दोघेही गुरुमाऊलीच्या चरणी ।। ४ ।।

गुरुकृपेचे छत्र असे हो त्या दोघांच्या शिरी ।
दोघेही म्हणती आमचा देव वसतसे रामनाथी ।
परम पूज्यांच्या गुरुपादुका ठेवल्या
त्यांनी हृदय सिंहासनी ।। ५ ।।

स्वातंत्र्य देऊनी घरच्यांनी साधनेसाठी साहाय्य केले ।
समाजाने त्यागले, मायेतील लोकांनी फसवले ।
सर्वांनी भंगार म्हणून सोडून दिले ।। ६ ।।

परम पूज्यांनी दोन्ही भंगारांना ठेवले हो चरणांसी ।
व्यष्टी आणि समष्टी करवूनी घेतली त्या दोघांकडूनी ।
आध्यात्मिक प्रगती करवून
भंगाराचे सोने केले हो परम पूज्यांनी ।। ७ ।।

जन्मोजन्माचे कल्याण केले हो परम पूज्यांनी ।
या ऋणांनी दोघेही मित्र गेले भारावूनी ।
चरणांजवळ राहू द्या प्रार्थना करती
गुरुमाऊलीच्या चरणी ।। ८ ।।

टीप १ – सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

टीप २ – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

– श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.७.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक