१. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’फेसबूक (इंग्रजी)
‘आज सकाळी मी उठले, तेव्हा माझ्या छातीत दुखत होते. मी पू. रेन्डीदादा यांना ‘फेसबूक लाइव्ह’ या कार्यक्रमात नामजप करतांना पाहिले आणि नंतर मला चांगले वाटू लागले.’ – श्रीमती एमिली व्हिन्सेंट कोब्राडोर
(‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संत पू. रेन्डी इकारांतियो ‘फेसबूक लाइव्ह’ या प्रणालीच्या माध्यमातून सामूहिक नामजप सत्संग घेतात. – संकलक)
२.‘एस्.एस्.आर्.एफ्’ (स्पॅनिश)
‘एस्.एस्.आर्.एफ्’ च्या संपर्कात येऊन साधनेला आरंभ केल्यावर शांत वाटणे आणि ‘साधनेच्या योग्य मार्गावर आहे’, अशी श्रद्धा वाटणे : ‘माझा साधनामार्ग कोणता आहे ?’, याविषयी मला पुष्कळ जिज्ञासा होती. ‘एस्.एस्.आर्.एफ्’शी परिचय झाल्यानंतर मला तो मार्ग सापडला आहे. ‘एस्.एस्.आर्.एफ्’ सांगत असलेल्या साधनेच्या टप्प्यांविषयी मी पूर्ण सहमत आहे. मी इतर मंत्रांसमवेत नामजपही करते. त्यामुळे मला पुष्कळ शांत वाटते. इतरांची श्रद्धा असो वा नसो, ‘मी योग्य मार्गावर आहे’, यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे.’ – श्रीमती माया पेझ, ड्यूटीमा, कोलंबिया.
३. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’(क्रोएशियन)
‘एस्.एस्.आर्.एफ्.’ करत असलेले संशोधन आणि सांगत असलेले नामजपादी उपाय यांमुळे जीवनावर सकारात्मक परिणाम होणे : ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ करत असलेले संशोधन, त्यावर आधारित विवेचन आणि सांगत असलेले नामजपादी उपाय यांचा माझ्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला आहे. वातावरणातील कित्येक घटक आणि प्रसंग यांचा आपल्या दैनंदिन जीवनावर प्रभाव पडत असतो. तुम्ही केलेल्या संशोधनात या सर्व पैलूंवर प्रकाश टाकून त्याविषयी योग्य मार्गदर्शन केले आहे.’ – श्री. डॉरिस डीन, सर्बिया
४. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’लॉग इन (भारत)
‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करू लागल्यावर मनातील वाईट विचारांचे प्रमाण उणावणे : ‘पूर्वी माझ्या मनात असंख्य वाईट विचार यायचे. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ने सुचवल्याप्रमाणे मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करू लागल्यानंतर या विचारांचे प्रमाण पुष्कळ उणावले. मी माझ्या मनाला ‘आईचे स्वतःच्या सद्वर्तनी मुलापेक्षा दुर्वर्तनी मुलाकडे अधिक लक्ष असते’ आणि ‘माझ्या मनातील वाईट विचारांमुळे माझी दुर्गामातेवरील श्रद्धा न्यून होऊ शकत नाही’, अशी सूचना देत होते. त्यानंतर माझ्या मनातील वाईट विचार पुष्कळ प्रमाणात नष्ट झाले.’ – एक साधिका, भारत
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |