तिरुपती (आंध्रप्रदेश) – भारताचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी येथील तिरुपती मंदिरात जाऊन भगवान श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी भगवान व्यंकटेश्वराची पूजा केली आणि एकांत सेवेतही सहभाग घेतला. या वेळी तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळाचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Chief Justice of India NV Ramana credits Lord Venkateswara for his successful career https://t.co/wTcSH07hNg
— India Legal (@indialegalmedia) June 11, 2021
सरन्यायाधीश रमणा हे कुटुंबियांसह जेव्हा मंदिरात आले, तेव्हा मंदिराच्या प्रवेशद्वारावर पुरोहितांनी त्यांचे मंत्रोच्चारांच्या घोषात स्वागत केले. सरन्यायाधीश रामणा हे आंध्रप्रदेशचे असून राज्यातून निवडले गेलेले ते पहिले सरन्यायाधीश आहेत.