भटकळ (कर्नाटक) येथे ६ वर्षांपासून अवैधरित्या रहाणार्‍या पाकिस्तानी महिलेला अटक !

आधारकार्ड, पॅनकार्ड, शिधापत्रिका आदी कागदपत्रे आढळली !

  • शत्रूराष्ट्राचा नागरिक ६ वर्षांपासून अवैधपणे रहात असतांना गुप्तचर यंत्रणांना कळले कसे नाही ? कि ते झोपा काढत होते ?
  • शत्रूराष्ट्राच्या नागरिकाला भारतातील अधिकृत शासकीय कागदपत्रे कुणी सिद्ध करून दिली, हे जनतेसमोर आले पाहिजे ! अशा देशद्रोह्यांना सरकारने फासावर लटकवायला हवे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटेल !
प्रतिकात्मक छायाचित्र

भटकळ (कर्नाटक) – येथे ६ वर्षांपासून अवैधरित्या रहाणार्‍या पाकिस्तानी महिलेला कर्नाटक पोलिसांनी अटक केली. खतिजा मेहरीन (वय ३३ वर्षे) असे या महिलेचे नाव असून तिच्याकडे भारताचे आधारकार्ड, पॅनकार्ड, शिधापत्रिका, जन्मदाखला आदी महत्त्वाची शासकीय कागदपत्रेही आढळून आली. तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

खतिजा हिचा विवाह भटकळ येथील रहिवासी असलेला मोईद्दिन रुक्कुद्दिन याच्याशी वर्ष २०१४ मध्ये दुबई येथे झाला. त्यानंतर ती ३ मासांच्या टुरिस्ट (पर्यटक) व्हिसावर भारतात आली आणि त्यानंतर वर्ष २०१५ पासून भटकळ येथे अवैधरित्या राहू लागली. तिला ३ अपत्येही आहेत. या कालावधीत तिने बनावट कागदपत्रांच्या आधारे वरील कागदपत्रे सिद्ध करून घेतली.