१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले घरी येणार आहेत’, या भावाने घराची स्वच्छता करणे आणि त्या वेळी सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांची मानस पाद्यपूजा करणे
‘मी घराची स्वच्छता करत असतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर आज घरी येणार आहेत’, असा भाव ठेवते. त्या वेळी मला जाणवते, ‘एका पुष्पक विमानातून परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्यासह घराच्या अंगणात उतरत आहेत. संपूर्ण अंगण फुलांनी सुशोभित केले आहे. ते दाराजवळ येताच माझ्या मनात रामभक्त केवटासारखा (प्रभु श्रीराम वनवासात असतांना त्यांना गंगा नदी पार करून नेणारे विष्णुभक्त नावाडी केवटासारखा) भाव जागृत होत आहे. मी परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु यांची पाद्यपूजा करत आहे. ही सेवा मिळाल्याविषयी माझ्याकडून गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त होत आहे.’
२. ‘परात्पर गुरु डॉक्टर घरी येणार असल्याने कोणती रांगोळी काढायची ?’, हे सूक्ष्मातून पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना विचारून रांगोळी काढल्यामुळे प्रतिदिन चैतन्यमय रांगोळी काढली जाणे
‘परात्पर गुरु डॉक्टर येणार आहेत, तर दारासमोर कोणती रांगोळी काढायची ?’, हे सूक्ष्मातून पू.(सौ.) उमाक्कांना (पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना) विचारतांना मी प्रार्थना केली, ‘पू. उमाक्का, मला रांगोळी काढता येत नाही. परात्पर गुरु डॉक्टर आल्यावर त्यांना बाहेर असतांनाच समजायला हवे की, हा सनातनचा आश्रम आहे. त्यासाठी आपणच माझा हात धरून माझ्याकडून रांगोळी काढण्याची सेवा करवून घ्या.’ ही प्रार्थना झाल्यावर सूक्ष्मातून पू. उमाक्कांचे अस्तित्व जाणवून प्रतिदिन चैतन्यमय रांगोळी काढली जाते. यासाठी परात्पर गुरु डॉक्टर आणि पू. उमाक्का यांच्या चरणी माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होते.
३. स्वयंपाक करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले येऊन तो महाप्रसाद ग्रहण करणार आहेत’, हा भाव ठेवणे आणि पू. (कु.) रेखा काणकोणकर यांना विचारून स्वयंपाक केल्यावर तो चैतन्यामुळे स्वादिष्ट होणे
स्वयंपाक करतांना मी ‘परात्पर गुरु डॉक्टर येऊन तो महाप्रसाद ग्रहण करणार आहेत’, असा भाव ठेवते आणि सूक्ष्मातून पू. (कु.) रेखाताईंना (पू. (कु.) रेखा काणकोणकर यांना) विचारून स्वयंपाक करते. ‘परात्पर गुरु डॉक्टरांना कोणते पदार्थ आवडतात ?’, हे आपणच मला सांगा. मला तसे पदार्थ बनवता येत नाहीत, तरी आपणच मार्गदर्शन करा’, अशी माझ्याकडून पू. रेखाताईंना प्रार्थना होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पदार्थ बनवल्यावर तो चैतन्यामुळे स्वादिष्ट होतो.
४. न्यायालयात नोकरी करतांना ‘सेवा करत आहोत’, असा भाव ठेवल्यामुळे कार्यालयीन काम अल्प वेळेत पूर्ण होणे
मी न्यायालयात नोकरीसाठी जाते. तेव्हा ‘गुरुकृपेने मला सेवेची संधी मिळाली आहे. मी आज दिवसभर परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशी सेवा करण्याचा प्रयत्न करीन’, असा भाव ठेवते. त्यामुळे दिवसभरातील सेवा जलद होऊन समयमर्यादेच्या आधीच आणि आनंदाने पूर्ण होते. त्या वेळी अन्य कर्मचारी मला विचारतात, ‘‘तुम्ही असे काय करता की, तुमची सेवा एवढ्या जलद पूर्ण होते ? दिवसभर सेवा केल्यानंतरही तुम्ही आनंदी दिसता.’’ तेव्हा मी त्यांना साधना सांगते. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने व्यवहारातसुद्धा ते माझ्याकडून साधना करवून घेत आहेत’, हे जाणवून माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होते. न्यायालयात पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे १५ वर्गणीदार झाले आहेत. त्यांच्यामध्ये काही अधिवक्ते आणि कर्मचारी आहेत. गुरुकृपेने सनातनच्या सात्त्विक उत्पादनांच्या वितरणाची सेवा होते. ८ – १० लोक भाववृद्धी सत्संगसुद्धा ऐकू लागले आहेत.’
– सौ. पिंकी माहेश्वरी, बुरहानपूर, मध्यप्रदेश. (११.१.२०२०)
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती१. ‘आई-बाबांना भेटायला माहेरी जायचे आहे’, असा भाव ठेवून रामनाथी आश्रमात यायला निघतांना पुष्कळ आनंद मिळणे ‘जेव्हा मी घरून रामनाथी आश्रमात यायला निघत होते, तेव्हा मला संतांचा सत्संग नाही मिळाला तरी चालेल’, असे वाटत होते; कारण मी प्रतिदिन संतांशी सूक्ष्मातून बोलतच असते. ‘मला माझ्या आई-बाबांना भेटायला माहेरी जायचे आहे’, असा भाव ठेवून निघतांना मला पुष्कळच आनंद अनुभवण्यास मिळाला. जेव्हा आश्रमात संतांचा सत्संग लाभला, तेव्हा ‘माझी माझ्या बाबांशी भेट झाली आहे आणि बाबा मला रिकाम्या हाताने कधीच परत पाठवत नाहीत’, असे वाटून माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘आपण मला जे पाहिजे, ते देऊ नका; परंतु माझ्यासाठी जे अपेक्षित आहे, ते मला अवश्य द्या.’ पुनःपुन्हा हीच प्रार्थना होऊन माझ्या मनाला आनंद होत होता. २. यज्ञाची भांडी घासण्याची सेवा केल्यावर हात काळे न होता मऊ होणे, त्यांना सुगंध येणे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आरतीसाठी घेतलेले तबक घासतांना ‘त्यातून चैतन्य शरिरात जात आहे’, अशी अनुभूती येणे रामनाथी आश्रमात ‘उग्र मातंगी यज्ञ’ झाला. त्या वेळी गुरुकृपेने यज्ञापूर्वी यज्ञाची भांडी घासण्याची सेवा मला मिळाली. घरी पावडरने भांडी घासतांना हात काळे होतात; परंतु यज्ञाची भांडी घासायला २ – ३ घंटे लागूनही माझे हात मुळीच काळे झाले नव्हते. माझे हात पुष्कळ मऊ झाले होते, तसेच हातांना सुगंधही येत होता. त्या वेळी माझ्या मनाला जाणवत होते, ‘जणूकाही परात्पर गुरुदेवांनी माझे अंतर्मन स्वच्छ करण्यासाठी मला ही सेवा दिली आहे.’ यज्ञ झाल्यानंतर तीच भांडी पुन्हा घासण्याची सेवा मला मिळाली. त्या वेळी ती भांडी अत्यल्प वेळेत स्वच्छ झाली आणि हातही काळे झाले नाहीत. त्या भांड्यांमध्ये श्रीसत्शक्ति बिंदामातेने ज्या तबकाने देवीची आरती केली होती, ते तबक होते. ‘त्यातून चैतन्य मिळून ते माझे सहस्रार आणि नाक यांच्या माध्यमातून संपूर्ण शरिरात जात आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी माझ्याकडून श्रीसत्शक्ति बिंदामातेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होऊ लागली.’ – सौ. पिंकी माहेश्वरी (११.१.२०२०) |
|