‘ओटीटी’ माध्यमांद्वारे भारतीय संस्कृतीचे खच्चीकरण करण्याचे षड्यंत्र ! – अभिनेत्री पायल रोहतगी

प्रतिकात्मक छायाचित्र

ब्रिटीश सैन्यात जसे भारतातील लोक क्रांतीकारकांच्या विरोधात लढत होते, तसेच आज या ‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप) माध्यमांतून भारतातील लोक देशविरोधी विचारसरणी पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘ॲमेझॉन प्राईम इंडिया’च्या ‘कन्टेन्ट’ विभागाच्या मुख्य अपर्णा पुरोहित यांची सरकारविरोधी विचारसरणी असल्याने त्या सातत्याने अशा वेब सिरीजला चालना देण्याचे कार्य करत आहेत. ओटीटी माध्यमांवरही अश्लील गोष्टी दाखवण्यात येत आहेत. या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे खच्चीकरण करण्याचे षड्यंत्र चालू आहे. हे रोखण्यासाठी एकत्र यायला हवे.