भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी आतापासून औषधी वनस्पतींची लागवड करा !

आपत्काळातील संजीवनी औषधी वनस्पती !

भाग २ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/482105.html

भाग ३

६.  घराभोवती लावता येण्याजोग्या सात्त्विक वनस्पती

६ अ. काही सात्त्विक वनस्पती आणि त्यांच्यामधून प्रक्षेपित होणारे देवतेचे तत्त्व : भारतात निरनिराळ्या देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या वनस्पती (झाडे) आहेत. (विदेशात तशा वनस्पती नसतात. असे असतांना भारतीय लोक कौतुकाने विलायती वनस्पती लावतात !) अशा वनस्पती / अशी फुलझाडे जागा असल्यास घराजवळ लावावीत. यामुळे त्या वनस्पतींमध्ये किंवा फुलांमध्ये संबंधित देवतेचे तत्त्व आकृष्ट होऊन त्यातून ते वायूमंडलात प्रक्षेपित होईल. परिणामी वायूमंडलाची शुद्धी होईल, तसेच तेथील वातावरण सात्त्विक आणि चैतन्यमय होऊन तेथील आध्यात्मिक त्रासही काही प्रमाणात अल्प होण्यास साहाय्य होईल.

– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.५.२०१७)

६ आ. वास्तूशास्त्रानुसार घराच्या विविध दिशांना शुभ फल देणारे वृक्ष

घराजवळ उद्यान (बाग) करायचे असल्यास ते घराच्या डाव्या बाजूला करावे.’

– (संदर्भ : अग्निपुराण, अध्याय २४७)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’)

समाजहितासाठी मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करणे, ही समष्टी साधनाच !

ज्या व्यक्तींकडे मध्यम (३ – ४ एकर) किंवा मोठ्या प्रमाणात लागवड करण्यायोग्य भूमी आहे, अशा व्यक्तींनी केवळ स्वतःच्या परिवारापुरताच विचार न करता समाजबांधवांचा विचार करून मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करावी. या लागवडीमुळे अनेकांना आयुर्वेदीय औषधे उपलब्ध होऊन त्यांचे आरोग्यरक्षण होईल. या निःस्वार्थी समाजसेवेच्या माध्यमातून अशा व्यक्तींची समष्टी साधना होईल !

आपत्काळाच्या दृष्टीने वनौषधींच्या लागवडीचे महत्त्व दर्शवणारी ही लेखमाला साधक आणि वाचक यांनी संग्रही ठेवावी.

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

 संपर्क : ९३२२३ १५३१७

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक