पू. डॉ. नंदकिशोर वेद यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावरही गुरूंवरील दृढ श्रद्धेमुळे त्यांना स्थिर रहाता आले. त्यामुळे त्यांना आनंदी आणि भावस्थितीत रहाता आले. ‘गुरुकृपेने असह्य वेदनांवर मात करून आनंदी कसे रहायचे ?’, हे वाचकांना या लेखातून शिकता येईल. या लेखाचा २२ मे या दिवशी पहिला भाग प्रसिद्ध करण्यात आला होता. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत. (भाग २)
भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/479248.html |
१०. ‘किमोथेरपी’च्या वेळी आलेल्या अनुभूती
१० इ. ‘किमोथेरपी’ चालू असतांना प.पू. दास महाराज भेटायला येणे आणि ‘किमोचे दुष्परिणाम सहन करण्याची शक्ती मिळण्यासाठी प.पू. दास महाराज यांच्यासारख्या उच्च पातळीच्या संतांचे दर्शन परात्पर गुरुदेवांच्या कृपेने घडले’, या विचाराने भावजागृती होणे : नंतर मी अर्धवट झोपेत असतांना मला क्षिप्राचा (मुलगी सौ. क्षिप्रा जुवेकर यांचा) आवाज ऐकू आला, ‘‘बाबा, बघा कोण भेटायला आले आहेत ?’’ मी डाव्या बाजूला वळलो आणि झोपाळलेल्या डोळ्यांनी ‘कोण आले आहे ?’, हे बघण्याचा प्रयत्न करू लागलो. येणार्या व्यक्तीची झलक बघताच मी विस्मयचकित झालो. ते प.पू. दास महाराज होते ! तात्काळ माझ्या मनात कृतज्ञताभावाचा झरा पाझरू लागला आणि भावावस्थेत मी रडू लागलो अन् वाणीहीन झालो. माझ्यासारख्या एका तुच्छ साधकाची परात्पर गुरुदेव किती काळजी घेतात ! मला ‘किमो’चे दुष्परिणाम सहन करण्याची शक्ती मिळण्यासाठी त्यांनी प.पू. दास महाराज यांच्यासारख्या उच्च पातळीच्या संतांचे दर्शन रुग्णालयात पडल्या पडल्याच करवून दिले. वाह रे माझे भक्तवत्सल दयाळू परात्पर गुरुदेव ! प.पू. दास महाराज यांनी प्रसाद दिला.
१० ई. भ्रमणभाषवर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी बोलतांना भावविभोर होणे आणि त्यांच्या वात्सल्यपूर्ण अन् चैतन्यमय वाणीने मन निर्भय, निश्चिंत आणि स्थिर होणे : जेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा भ्रमणभाष आला, तेव्हा मी भावविभोर झालो. त्यांनी सांगितले, ‘‘परात्पर गुरुदेवांचे सतत तुमच्यावर लक्ष आहे आणि त्यांनी असेच आनंदात रहायला सांगितले आहे.’’ त्यांच्या वात्सल्यपूर्ण आणि चैतन्यमय वाणीने माझे मन एकदम निर्भय, निश्चिंत अन् स्थिर झाले.
१० उ. गुरुकृपेने किमोचे दुष्परिणाम अत्यल्प प्रमाणात होणे आणि आनंदात रहाता येणे : ७.१.२०२० या दिवशी मला रुग्णालयातून सोडण्यात आले आणि मी आश्रमात परत आलो. गुरुकृपेमुळे मी आनंदात राहू शकत होतो आणि माझ्यावर किमोथेरपीचे आधुनिक वैद्यांना अपेक्षित दुष्परिणाम अत्यल्प प्रमाणात झाले. मला पाहून सद्गुरु, संत आणि साधक म्हणतात, ‘‘तुमच्याकडे पाहून ‘तुम्ही आजारी आहात’, असे वाटतच नाही.’
१० ऊ. ‘बोन मॅरो’चा तपासणी अहवाल चांगला येणे आणि यासाठी आधुनिक वैद्यांनी ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अन् आश्रमातील सर्व साधकांना धन्यवाद देणे : दोन मासांनंतर ‘बोन मॅरो’ची दुसरी ‘बायॉप्सी’ (‘रुग्णामध्ये कर्करोगाचे विषाणू आहेत कि नाहीत ?’, हे पहाण्यासाठी केली जाणारी चाचणी) झाली. जेव्हा त्याचा अहवाल आला, तेव्हा आधुनिक वैद्यांनी मला पुढील संदेश ‘व्हॉट्सअॅप’वरून पाठवला, ‘आपल्याला सांगण्यास पुष्कळ आनंद होत आहे की, तुमचा ‘बोन मॅरो’चा तपासणी अहवाल चांगला आला आहे. हे सफल होण्यासाठी सर्वशक्तीमान ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. हे सफल होण्यासाठी आश्रमातील सर्व साधकांना धन्यवाद !’
१० ए. उपचार घेणार्या अल्प वयाच्या व्यक्तीच्या ‘बायॉप्सी’चा अहवालापेक्षा साधकाचा अहवाला चांगला येणे आणि ‘यात आश्रमाचे (परात्पर गुरु डॉक्टरांचे) योगदान आहे’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे : नंतर आम्ही आधुनिक वैद्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितले, ‘‘तुमच्या समवेत रक्ताचा कर्करोग झालेले एक रुग्ण आले आहेत; परंतु त्यांचे वय ४५ वर्षे असल्यामुळे त्यांना औषधाचे प्रमाण थोडे अधिक दिले होते आणि तुमचे वय अधिक (६६ वर्षे) असल्यामुळे तुम्हाला औषध अल्प प्रमाणात दिले होते. दोघांची ‘बोन मॅरो’ची दुसरी ‘बायॉप्सी’ साधारणतः एकाच वेळी केली होती. मला आशा होती की, त्या व्यक्तीचा अहवाल तुमच्यापेक्षा अधिक चांगला असेल; परंतु याच्या विपरीत घडले. तुमचा अहवाल त्याच्यापेक्षा पुष्कळच चांगला आला. यामध्ये आश्रमाचे (परात्पर गुरु डॉक्टरांचे) योगदान आहे.’’
१० ऐ. ‘तुमच्यावर ईश्वराची पुष्कळ कृपा असल्यामुळे किमोचे दुष्परिणाम अल्प झाले आहेत’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे : पुढे एक किमो घेण्यासाठी एक दिवस आणि त्याचा दुष्परिणाम न्यून करण्यासाठी ३ दिवस लागत होते. या कालावधीत आधुनिक वैद्यांनी एकदा सांगितले, ‘‘तुमच्यावर ईश्वराची पुष्कळ कृपा असल्यामुळे याचे दुष्परिणाम अल्प झाले आहेत. अन्य रुग्णांना सामान्यतः यामुळे पुष्कळ त्रास होतो. त्यामुळे कधी कधी ही औषधे थांबवावी लागतात.’’ मला वाटते, ‘आधुनिक वैद्य आणि काही अन्य कर्मचारी यांना माझ्या संदर्भात गुरुकृपेची काहीतरी जाणीव होत असावी.’
११. या रोगाचा उपचार पुष्कळ खर्चिक आहे. तेवढे धन माझ्याजवळ नव्हते; परंतु ईश्वराच्या कृपेने त्याचीसुद्धा व्यवस्था झाली.
१२. आजारातील असह्य वेदना, रक्ताचा कर्करोग आणि त्यांच्या उपचारांचे दुष्परिणाम परात्पर गुरुदेवांच्या कृपेने सुसह्य होणे अन् त्याचसह सतत आनंदातही रहाता येणे
मागील ११ मासांपासून अत्यंत वेदनादायक एँकीलोजिंग स्पाँडिलाइटिस’च्या (Ankylosing Spondylitis च्या) तीव्र आणि असह्य वेदना, रक्ताचा कर्करोग अन् त्याच्या उपचारांचा त्रास आणि दुष्परिणाम परात्पर गुरुदेवांनी माझ्यासाठी नुसते सुसह्य केले असे नाही, तर त्याचसह मला सतत आनंदातही ठेवले आहे. त्यासाठी ‘कृतज्ञता’ शब्द अपुरा वाटतो.’
(समाप्त)
– डॉ. नंदकिशोर वेद, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.११.२०२०)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवालासाहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेककथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचाप्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांतसांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहूनअधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहूनअल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिकस्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. हीपंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदनाजाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजेत्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |