आध्यात्मिक त्रासामुळे साधकाच्या मनात येणारे आत्महत्येचे विचार साधनेमुळे नाहीसे होऊन त्याचे रक्षण होणे, याचे सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

१. ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण

१ अ. वाईट शक्ती (पाताळातील मोठी वाईट शक्ती)

१ अ १. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाला वाईट शक्तीने त्रास देणे : साधकाला त्रास देणारी वाईट शक्ती (पाताळातील मोठी वाईट शक्ती) साधकाच्या मनात आत्महत्येचे विचार घालत होती.

१ आ. त्रासदायक शक्ती

१ आ १. त्रासदायक शक्तीचे वलय आत्महत्येच्या विचारांसहित साधकाच्या आज्ञाचक्रस्थानी कंपनांच्या स्वरूपात कार्यरत होणे

१ इ. भावना

१ इ १. भावनेचे वलय अधून मधून साधकाच्या अनाहत चक्रस्थानी कार्यरत होणे : काही प्रसंगांमुळे साधक जेव्हा भावनाशील होतो, तेव्हा वाईट शक्ती या मनःस्थितीचा अपलाभ घेऊन साधकाच्या मनातील नकारात्मक विचार वाढवतो.

१ ई. अहं

१ ई १. अहंचे वलय साधकाच्या अनाहत चक्रस्थानी कार्यरत असणे

१ उ. भाव

१ उ १. भावाचे वलय साधकाच्या अनाहत चक्रस्थानी कार्यरत होणे : साधक साधना करत असल्याने असे होते.

१ ऊ. शक्ती

१ ऊ १. ईश्‍वराकडून आलेले शक्तीचे कण साधकाकडे प्रवाहित होणे : साधक साधना करत असून त्याच्यात भाव असल्याने असे होते. त्यामुळे साधकाच्या मनात नामजप करण्याचे विचार येतात. ‘आत्महत्येचा विचार हा माझा नसून वाईट शक्तीने माझ्या मनात घातला आहे’, हे साधकाच्या लक्षात येऊन तो सतर्क रहातो.

१ ऊ २. शक्तीचे चक्राकार वलय साधकाच्या आज्ञाचक्रस्थानी कार्यरत होणे : त्यामुळे साधकाची बुद्धी सात्त्विक बनते आणि त्याच्या मनातील आत्महत्येचा विचार नाहीसा होतो.

१ ऊ ३. शक्तीचे कण ईश्‍वराकडून साधकाच्या अनाहत चक्रस्थानी प्रवाहित होणे

१ ऊ ४. शक्तीचे चक्राकार वलय साधकाच्या अनाहत चक्रस्थानी कार्यरत होणे : साधकाची भावनाशीलता न्यून व्हावी, यासाठी असे होते.

१ ए. चैतन्य

१ ए १. चैतन्याचा प्रवाह ईश्‍वराकडून साधकाकडे प्रवाहित होणे : आत्महत्येच्या विचारांपासून साधकाचे रक्षण होण्यासाठी असे होते.

१ ए २. चैतन्याचे वलय साधकाच्या डोक्याभोवती कार्यरत होणे : यातून साधकावर आध्यात्मिक उपाय होतात आणि त्याच्या मनात सकारात्मक विचार येतात.

१ ए ३. चैतन्याचे कवच साधकाच्या देहाभोवती निर्माण होणे : साधकाचे वाईट शक्तींपासून संरक्षण होण्यासाठी असे होते.

१ ए ४. चैतन्याचे वलय साधकाच्या अनाहत चक्रस्थानी कार्यरत होणे : साधकाचा अहं आणि भावनाशीलता न्यून होण्यासाठी असे होते.

१ ऐ. विघटन शक्ती

१ ऐ १. विघटन शक्तीमुळे साधकातील त्रासदायक शक्तीचे विघटन होऊन ती नष्ट होणे : त्यामुळे साधकाच्या मनात येणारे आत्महत्येचे विचार नाहीसे होतात.

२. इतर सूत्रे

अ. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाच्या मनातच आत्महत्येचे विचार येतात. वाईट शक्ती प्रथम साधकातील अहं आणि भावनाशीलता वाढवतो. त्यामुळे साधकाच्या मनात आत्महत्येचे विचार येतात.

आ. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाच्या मनात आत्महत्येचे विचार येत नाहीत.

इ. साधक साधना करत असल्याने, तसेच त्याच्यात ईश्‍वराप्रती भाव असल्याने ईश्‍वराकडून त्याला चांगली शक्ती मिळते. त्यामुळे ‘आत्महत्येचा विचार हा माझा नसून वाईट शक्तीने माझ्या मनात घातला आहे’, हे त्याच्या लक्षात येते आणि साधक सतर्क होतो.

ई. अशा प्रकारे आध्यात्मिक त्रासामुळे साधकाच्या मनात आत्महत्येचे विचार आले, तरी साधनेमुळे त्याच्या मनातील आत्महत्येचे विचार नाहीसे होतात आणि त्याचे रक्षण होते.’

– सौ. योया वाले, एस्.एस्.आर्.एफ्. (१०.१०.२०१९)

  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.