डॉ. नंदकिशोर वेद यांचे अंत्यदर्शन घेत असतांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी संतत्व प्राप्त करण्याविषयी मिळालेली पूर्वसूचना !

कै. डॉ. नंदकिशोर वेद

१. मृत्यूनंतरही डॉ. नंदकिशोर वेद यांचा देह सजीव वाटणे

​‘डॉ. नंदकिशोर वेद यांच्याकडे पाहिल्यावर ‘त्यांचा श्‍वासोच्छ्वास चालू असून ते आता कधीही उठून बसतील’, असे मला जाणवत होते. त्यांचे निधन झाले असूनही त्यांचा देह पूर्णपणे सजीव वाटत होता आणि त्यांचा तोंडवळा चैतन्यामुळे पिवळा झालेला दिसत होता.

२. ते नेहमी भेटल्यावर मला ‘नमस्ते’ म्हणायचे, तसा मला सूक्ष्मातून आवाज ऐकू आला.

३. या प्रसंगी वातावरणात कोणत्याही प्रकारचा दाब जाणवत नव्हता. तसेच एक वेगळ्या प्रकारचा सूक्ष्म सुगंध येत असल्याचे जाणवले.

४. ‘डॉ. नंदकिशोर वेद लवकरच ‘समष्टी संत’ होतील’, असे जाणवणे

​डॉ. वेद यांनी गेल्या काही दिवसांपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत नामजप, प्रार्थना आणि परात्पर गुरुदेवांची भक्ती अत्युच्च केल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्क्यांवरून ६८ टक्के झाल्याचे जाणवले आणि ते लवकरच ‘समष्टी संत’ होतील, असेही जाणवले.’

​(योग्य आहे. २२.५.२०२१ या दिवशी डॉ. नंदकिशोर वेद यांची आध्यात्मिक पातळी ७१ टक्के होऊन ते ‘समष्टी संत’ म्हणून संतपदी विराजमान झाले. – संकलक)

– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०२१)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्यकरतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांतआहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्रदिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिकप्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांनाडोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकटसर्वांनाच येतील असे नाही. – संपादक