बलोपासना करून भक्ती, शक्ती आणि मनोबल वाढवा ! – विजय चौधरी, हिंदु जनजागृती समिती

 सोलापूर जिल्ह्यात ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान

सोलापूर, १४ मे (वार्ता.) – देशाची सध्याची स्थिती पुष्कळ विदारक आहे. सर्वत्र नक्षलवाद, हिंसाचार, बलात्काराच्या घटना दिवसागणिक वाढतच आहेत. हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे, संतांची हत्या करणे, काश्मिरी हिंदूंची हत्या असे अनेक आघात होत आहेत. यावरून हिंदू किती असुरक्षित आहेत, हे लक्षात येते. अशा संकटांचा संघटितपणे सामना करण्यासाठी बलोपासना करून भक्ती, शक्ती आणि मनोबल वाढवा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय चौधरी यांनी केले. येथे नुकत्याच झालेल्या ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात ते बोलत होते. सोलापूर जिल्ह्यातील अनेक धर्मप्रेमी या शौर्यजागृती व्याख्यानात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्नेहल पारे यांनी केले.

अभिप्राय

१. सौ. शरण्या गोरे – कार्यक्रमाच्या माध्यमातून धैर्य आणि साहस असणे किती आवश्यक आहे ? हे शिकता आले. हे व्याख्यान ऐकल्यानंतर ‘इतरांचेही संरक्षण करता आले पाहिजे’, असे वाटू लागले.

२. अर्चना चोरमले – व्याख्यान ऐकून चांगले वाटले. काळानुसार ही माहिती पुष्कळ आवश्यक आहे, हे लक्षात आले.