रुग्णालयातील खाटांचा काळाबाजार करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवा ! – इक्बालसिंह चहल, आयुक्त, मुंबई महानगरपालिका

इक्बालसिंह चहल

मुंबई – महानगरपालिकेच्या रुग्णालयांत उपलब्ध खाटांचा नियमित आढावा घ्यावा, तसेच खाटांची विक्री करून काळाबाजार करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवा, असे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत.

याविषयी आयुक्त इक्बाल चहल म्हणाले, ‘‘महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सध्या पुरेशा खाटा उलपब्ध आहेत. त्यांचे वितरण अत्यंत पारदर्शक पद्धतीने नियंत्रण कक्षांद्वारे केले जात आहे. या विषयीची सर्व माहिती संबंधित संगणकीय प्रणालीमध्ये उपलब्ध आहे. ही माहिती नियमित अद्ययावत होत असते. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. खाटांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीस किंवा महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षात द्यावी.’’