६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली पुणे येथील बालसाधिका कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ (वय १४ वर्षे) हिने ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने केलेली कविता !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. आर्या श्रीश्रीमाळ ही एक आहे.

​पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक स्तर असलेली बालसाधिका कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ (वय १४ वर्षे) हिचा वैशाख शुक्ल पक्षद्वितीया (१३.५.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. ८.३.२०२१ या दिवशी झालेल्या ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने स्त्री शक्तीचे महत्त्ववर्णन करणारी कु. आर्याने केलेली कविता येथे दिली आहे.

कु. आर्या श्रीश्रीमाळ

कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ हिला वाढदिवसाच्या निमित्ताने सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !

एक विश्वरूपी प्रेरणा तू ।

अबला नाही, सबला तू ।
स्त्री शक्तीचा जागर तू ।
आजार नाही, औषध तू ।
जगण्याची नवी उमेद तू ।। १ ।।

त्रास नाही, विश्वास तू ।
सर्वांचे आत्मबळ तू ।
दुःख नाही, सुख तू ।
चेहर्‍यावरील हसू तू ।
उत्तुंग भरारी घे तू ।
मागे कधी वळू नको तू ।। २ ।।

कधी मुलगी, कधी मैत्रीण ।
कधी बहीण, कधी पत्नी ।
कधी आई, तर कधी आजी तू ।
कधी दुर्गा, कधी लक्ष्मी ।
कधी सरस्वती, तर कधी अन्नपूर्णा तू ।
या अन् अशा अनेक नात्यांची परिभाषा तू ।। ३ ।।

अशक्य ते शक्य करतेस तू ।
सत्याची साथ देतेस तू ।
स्वसुखाचा त्याग करून ।
प्रसंगी दुःखही कवटाळतेस तू ।​
आहेस एक विश्वरूपी प्रेरणा तू ।। ४ ।।

– कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ, पुणे (वय १४ वर्षे) (८.३.२०२१)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.