उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. श्रीलक्ष्मी विजय रेवणकर ही या पिढीतील एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. शांत आणि स्थिर स्वभाव
‘श्रीलक्ष्मी लहानपणापासूनच शांत आणि स्थिर स्वभावाची आहे. प्रत्येक प्रसंगात ती सकारात्मक असते. तिला एखादी वस्तू दिली, तर ती सकारात्मक राहून तिचा स्वीकार करते.
२. इतरांशी जुळवून घेणे
श्रीलक्ष्मी कुणाशीही सहजतेने जुळवून घेते. आमच्या घरी तिच्या वयाचे कुणीही नाही, तरीसुद्धा ती पुष्कळ आनंदात असते.
३. प्रेमभाव
अ. श्रीलक्ष्मीला पाळीव प्राणी आवडतात. आमच्या घरी गायी आणि मांजरे आहेत. त्यांच्याशी ती अतिशय प्रेमाने वागते. या प्राण्यांनासुद्धा श्रीलक्ष्मीची चांगली सवय आहे.
आ. श्रीलक्ष्मी घरी आजी-आजोबांची पुष्कळ काळजी घेते. ती त्यांच्याशी अतिशय प्रेमाने वागते. साधकांविषयी तिच्या मनात पुष्कळ प्रीती आहे. घरी कोणी साधक आल्यास ती त्यांच्यासह रहाते आणि ‘साधकांनी आपल्या घरी रहावे’, असा ती आग्रह करते.
४. व्यष्टी साधनेचे प्रयत्न
श्रीलक्ष्मी लहानपणापासूनच प्रतिदिन १० ते ३० मिनिटे नामस्मरण करते. आता ती प्रतिदिन ४५ मिनिटे नामस्मरण करते, तसेच नामजपादी उपायही नियमितपणे करते.
५. सेवेची आवड
श्रीलक्ष्मी शिवमोग्गा केंद्रात साधकांसह ग्रंथप्रदर्शन कक्षावर सेवेसाठी जाते. तेथे ती चांगल्या प्रकारे सेवा करते.
६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
श्रीलक्ष्मीचा प.पू. गुरुदेवांप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती) पुष्कळ भाव आहे. ती प्रतिदिन रात्री झोपतांना आपल्या उशीजवळ प.पू. गुरुदेव आणि प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) यांची छायाचित्रे अन् ‘सनातन प्रभात’ हे नियतकालिक ठेवून झोपते.
७. श्रीलक्ष्मीमधील स्वभावदोष
आळशीपणा, दायित्वशून्यता आणि ऐकण्याची वृत्ती नसणे.’
– श्री. विजय रेवणकर (कु. श्रीलक्ष्मीचे वडील, आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४५ वर्षे), शिवमोग्गा, कर्नाटक. (२५.५.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |