अमरावतीकडे लक्ष न दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आंदोलन करू ! – आमदार रवी राणा यांची चेतावणी

आमदार रवी राणा

अमरावती – जिल्ह्यात कोरोना रुग्णांना ऑक्सिजन अल्प पडत आहे. लसीकरणाची केंद्रे बंद आहेत. जिल्ह्यात प्रतिदिन १ सहस्रांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत, तर ३०-३५ रुग्ण मरण पावत आहेत; मात्र याकडे दुर्लक्ष केले होत आहे. मी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना भेटून जिल्ह्यातील परिस्थिती सांगितली होती; मात्र यावर काहीच कारवाई झाली नाही. याकडे जर मुख्यमंत्री लक्ष देत नसतील, तर येणार्‍या काळात मलाच मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आंदोलन करावे लागेल, अशी चेतावणी बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी ७ मे या दिवशी दिली आहे.