नवी मुंबई, ७ मे (वार्ता.) – नवी मुंबई महापालिकेने ४५ वर्षांवरील नागरिकांना त्यातही विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना सुलभ रितीने कोरोनाची लस घेता यावी, यासाठी वाहनात बसून लस घेण्याचा (ड्राइव्ह इन लसीकरण) उपक्रम चालू केला आहे. सीवूड नेरूळ येथील ग्रॅँड सेंट्रल मॉल आणि वाशी येथील इनॉर्बिट मॉल या दोन ठिकाणी वाहनांतून आलेल्या नागरिकांना लस देण्यात आली. लसीकरण झाल्यानंतर त्यांना वाहनतळाच्या विशिष्ट जागेत निरीक्षणासाठी अर्धा घंटा थांबवण्यात आले. या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी १४६ नागरिकांनी लस घेतली.