बेळगाव – रेमडेसिविर इंजेक्शनचा उत्पादन प्रकल्प बेळगावात चालू करण्यास केंद्र सरकारने मुधोळच्या सतीश घारगी यांना अनुमती दिली आहे. येत्या काही दिवसातच हा प्रकल्प चालू होणार असून उत्पादनानंतर येथूनच रेमडेसिविरचा सर्वत्र पुरवठा करण्यात येईल. आगामी १ मासात ही प्रक्रिया होईल आणि १ मासात बेळगावात रेमडेसिविर उपलब्ध होईल. यामुळे कर्नाटकातील रेमडेसिविरची टंचाई दूर होण्यास साहाय्य होईल, अशी माहिती कर्नाटक राज्याचे खाण व भूगर्भ विज्ञान मंत्री मुरुगेश निराणी यांनी दिली.