वेरूळ (जिल्हा संभाजीनगर) येथील श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर स्वामी भागवतानंद गिरीजी महाराज यांचा देहत्याग

१. श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर स्वामी भागवतानंद गिरीजी महाराज २.श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर स्वामी भागवतानंद गिरीजी महाराज यांची समाधी

संभाजीनगर – जिल्ह्यातील श्री क्षेत्र वेरूळ येथील कैलास आश्रमाचे मठाधिपती श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर स्वामी भागवतानंदगिरीजी महाराज यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने येथील खासगी रुग्णालयामध्ये २९ एप्रिलच्या रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी निधन झाले. ३० एप्रिल या दिवशी सकाळी ११ वाजता त्यांच्या समाधीचा सोहळा पार पडला. या घटनेमुळे वेरूळ सह परिसरातील भाविक हळहळ व्यक्त करत आहेत. महाराजांचा वेरूळ परिसर आणि राज्यासह परराज्यातही मोठा भक्त परिवार आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांना या समाधीच्या सोहळ्यास येणे शक्य नसल्याने अनेक भाविकांनी सामाजिक माध्यमातून समाधीचा सोहळा पाहिला. या वेळी भक्त परिवारातील ठराविक प्रमुखासह महामंडलेश्‍वर स्वामी मुक्तानंद गिरी महाराज, महंत स्वामी रामेश्‍वर महाराज, महंत स्वामी नित्यानंद महाराज, महंत गोपाल नंद महाराज, सरवानंद महाराज, महंत स्वामी भरतगिरी महाराज, महंत स्वामी नामदेव गिरी महाराज, स्वामी कैवल्यानंदजी महाराज यांची उपस्थिती होती.