कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या मशिदीवर तहसीलदारांनी घातली धाड !

कुंभमेळ्यावरून हिंदूंवर टीका करणारे याविषयी बोलतील का ?

कोडगू (कर्नाटक) – कोडगू जिल्ह्यातील विराजपेटे तालुक्यातील अर्जी या गावातील एका मशिदीत १५० पेक्षा अधिक मुलांना धार्मिक उपदेश देण्यात आला. मशिदीच्या बाहेर मात्र कोविड नियमानुसार मशीद बंद करण्यात आल्याचा मोठा फलक लावण्यात आला होता; परंतु मशिदीच्या आत १५० पेक्षा अधिक मुलांना जमवून मौलवींकडून नियमबाह्य वर्तन करण्यात आले. ही माहिती मिळताच विराजपेटे येथील तहसीलदार योगानंद आणि पोलीस यांनी धाड घातली. धाड घातल्यावर मौलवींनी तहसीलदारांना उडवाउडवीची उत्तरे देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मशिदीत १५० पेक्षा अधिक मुले मास्क न घालता, सुरक्षित अंतर न ठेवता प्रार्थना करत होती. त्याच ठिकाणी मौलवी धार्मिक उपदेश करत असल्याचे उघडकीस आले. या पार्श्‍वभूमीवर मशिदीच्या कार्यकारी मंडळाच्या विरोधात विराजपेटेचे तहसीलदार योगानंद यांनी गुन्हा नोंदवून कारवाई केली.

विराजपेटे येथील कूर्ग दंत महाविद्यालयातही कोविड नियमांचे उल्लंघन करून वर्ग घेण्यात येत होते. या महाविद्यालयात धाड घालून तहसीलदार योगानंद यांनी महाविद्यालयाच्या विरोधात गुन्हा नोंदवला.