जुलै २०२० मध्ये एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

अ. एस्.एस्.आर्.एफ्. इंग्रजी फेसबूक – संकेतस्थळावरील लेखांमधून स्वतःतील ‘नकारात्मक विचार करणे’ या स्वभावदोषाची जाणीव होऊन त्यावर मात करण्याची प्रेरणा मिळाली ! : ‘मला ‘माझ्यातील ‘नकारात्मक विचार करणे’ या स्वभावदोषामुळे वाईट शक्ती आपल्यावर ताबा मिळवतात आणि आपली साधना करण्याची क्षमता घटते’, याची जाणीव झाली. त्यावर मात करण्यासाठी मी अधिक एकाग्रतेने प्रयत्न करीन. संकेतस्थळावर उत्तम लेख प्रकाशित केल्याविषयी मी आपले आभार मानते. मी तुमच्याकडून पुष्कळ शिकते आहे. तुमचा साधकांचा गट थक्क करणारा आहे.’ – पॅट्रिशिया कॅटझोव्हा

आ. एस्.एस्.आर्.एफ्. लाइव्ह चॅट

आ १. एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ आणि साधक यांना भेटून आनंद होणे आणि संकेतस्थळावर शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असल्याचे जाणवणे : ‘माझ्याशी संपर्क करून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद ! ‘एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ आणि तुमची (साधकांची) भेट झाली’, याचा मला आनंद होत आहे. तुमचे संकेतस्थळ अतिशय सुंदर आहे आणि येथे शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.’ – श्रीमती अ‍ॅनी स्केरी, व्हरमाँट, अमेरिका.

आ २. भविष्यकाळात घडणार्‍या पालटांच्या संदर्भात वर्तवलेल्या अचूक भाकितांमुळे एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाने लक्ष वेधून घेणे आणि दिवसागणिक यातील अचूकपणा अधिक जाणवणे : ‘आपल्या सर्वांना ठाऊक असलेल्या सध्या घडणार्‍या पालटांच्या संदर्भात वर्तवलेल्या अचूक भाकितांमुळे एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाने बर्‍याच वर्षांपूर्वी माझे लक्ष वेधून घेतले होते. गेली अनेक वर्षे या भाकितांप्रमाणे घटना घडत आहेत. दिवसागणिक यातील अचूकपणा अधिक जाणवत आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर मी आणि माझी पत्नी निवृत्त होऊन उरलेले आयुष्य साधना आणि ध्यानधारणा यांसाठी देणार आहोत. आम्ही वैष्णव संप्रदायाशी संबंधित असल्याने ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप पुष्कळ करतो. आपण सांगितलेले अन्य नामजप अभ्यासून आम्ही कृतज्ञतापूर्वक करू. ‘तुमच्या निःस्वार्थी कार्याची ओळख होऊन आम्ही आपल्या संपर्कात आलो’, हे आमचे भाग्य आहे. तुमच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याला आमचा कृतज्ञतेने आणि आदराने नमस्कार ! तुमच्या सूचनेनुसार आम्ही संकेतस्थळावरील माहितीचा अभ्यास करू, तसेच एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने घेण्यात येणार्‍या सत्संगातही उपस्थित रहाण्याचा प्रयत्न करू.’ – श्री. राफेल, लिमा, पेरू.

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक