आगरा (उत्तरप्रदेश) येथे महिलेवर पतीसमोरच सामूहिक बलात्कार

कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेला उत्तरप्रदेश !

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील एत्मादपूर परिसरात एक दांपत्य दुचाकीवरून जात असतांना तिघांनी त्यांना अडवले आणि जंगलात नेले. तेथे त्यांनी पतीला मारहाण करत त्याच्या समोरच पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी यावेळी या दांपत्याची आक्षेपार्ह छायाचित्रे काढले आणि चित्रीकरणही केले. बलात्कारानंतर या दांपत्याकडील रोख १० सहस्र रुपये, दागिने घेऊन त्यांनी पलायन केले. या घटनेची तक्रार करण्यात आल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा ते शोध घेत आहेत.