सिंधुदुर्ग- आयुर्वेद आणि वनौषधी यांचे महत्त्व जाणून त्यांची लागवड अन् संवर्धन करण्यासाठी भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत जनशिक्षण संस्थान, सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘औषधी वनस्पतींची लागवड, संवर्धन अन् काढणीनंतरचे व्यवस्थापन कसे करावे ?’ याविषयी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. याविषयीचे वृत्त २१ मार्च २०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वृत्ताची नोंद घेत जनशिक्षण संस्थानने त्यांच्या ‘फेसबूक’ पानावर ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त प्रसिद्ध केले आहे, तसेच त्यांच्या या उपक्रमाला प्रसिद्धी दिल्याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संपादकांचे आभार व्यक्त केले आहेत.